मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार का, या संदर्भात चर्चा होत आहे. अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करण्यासाठी विशेष समितीची स्थापना केली गेली असून वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. पुनर्वसनातील अडचणींची चौकशी करून समिती नवीन उपाययोजना सुचवणार आहे.