संजय राऊतांनी त्यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या सुरुवातीपासूनच पंतप्रधान मोदी, शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्या आहेत. त्यांच्या पुस्तकातून मोदी आणि शदर पवार यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना कमजोर म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "तुम्हाला कळत नाही, तुम्ही कश्मीर प्रश्नाचा आंतरराष्ट्रीकरण करत आहात. तुम्ही जगात प्रश्न घेऊन जाताय याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत. 200 दोश फिरले एकही देश पाठीशी उभा राहिला नाही. म्हणून तुमच्यावर ही नौटंकी करण्याची वेळ आली आहे. दहदवाद्यांच्या पुर्ण विमोड करण्याची क्षमता असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर करुन पाकिस्तानच्या दहशदवाला मोटकाट सोडल. डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याची गरज का भासली हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे".