आज संजय राऊत पत्रकार परिषद घेत असताना अनेक विषयांवर चर्चा करत आपला संताप व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी संजय राऊत नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना म्हणाले की, "निवडणूक प्रचारामध्ये भाजप सैनिकांच्या गणवेशाचा गैर वापर करत होते. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर तुम्ही कसं लष्करी गणवेश घालू शकता? त्यामुळे संपुर्ण देशाला माहित आहे की, नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे निवडणुक कशाप्रकारे जिंकत आहेत".
"एकनाथ शिंदे यांच काय ऐकायचं. त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं, जर ते खरोखर बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेमी असतील तर काय चर्चा झाली हे त्यांनी त्यांच्या मनाला विचाराव. तुम्ही किती कोट बोलाल, तुम्ही किती भ्रष्ट आहात हे सर्वोच्च न्यायालयाने कमिशन बाजीवर हल्ला केला त्यावरून स्पष्ट होतं. मी जे बोललो आहे ते शंभर टक्के खरं आहे. मी त्याचा साक्षीदार आहे". असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.