बदलापूरच्या घटनेवरुन संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. बदलापूरच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल का नाही असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केली आहे. कोलकाताच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. आरोपी अटकेत आहेत, पोलीसांकडून तपास सुरु आहे मग SIT ची गरज काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. फडणवीयांच्या तोंडून SIT ची भाषा शोभत नाही असं राऊत म्हणाले. गिरीश महाजनांचं डोकं फिरलेलं असल्याची टीका देखील संजय राऊतांनी केली आहे.