सिंधुदुर्गातल्या पुतळा दुर्घटनेवरून संजय राऊतांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'इतिहासात काय जाता शिवरायांचा अपमान झाला आहे त्यावर बोला', असं संजय राऊत म्हणाले आहेत. केसरकरांनी शिवरायांचा अपमान केलेला आहे फडणवीसांनी त्यावर बोलावं, फडणवीस हे औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन आहेत असा संजय राऊतांचा घणाघात आहे.
संजय राऊत म्हणाले की, केसरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा निर्मितीसाठी जो भ्रष्टाचार करण्यात आला त्याच्यावर बोला. तुम्ही हे सांगा की अपमान का केला? तुमची मानसिकता काय आहे. आम्ही पाहिलं औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन कोण आहेत ते, औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांचे लोक त्या क्लबचे मेंबर्स आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी आम्ही आंदोलन केलं आणि हे आंदोलन विस्कळीत करण्याचा अपराध देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने केला आहे.