राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) आणि शिवसेनेचे ( ठाकरे गट ) आमदार, खासदार फोडण्याचे प्रयत्न शिंदे गट आणि अजितदादा पवार यांच्याकडून सुरू आहेत. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी टीका करत मोठा दावा केला आहे. जोपर्यंत शरद पवार यांचे खासदार फोडले जात नाही तोपर्यंत अजित पवार गटाला मंत्रिपद मिळणार नाही. हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. पटेलांना सांगण्यात आलं आहे की, केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे तो तुम्ही पूर्ण करा. त्यासाठी पवार गटाचे सहा ते सात खासदार फोडल्यावर तुमचा खासदार पकडून आकडा पूर्ण होईल तेव्हा पटेलांना मंत्रिपद मिळेल. याचा महाराष्ट्राला आणि देशाला काही उपयोग नाहीये. प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचंय म्हणून पवारांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण हा नीच आणि निर्लज्जपणा आहे. अस ते म्हणाले आहेत.