व्हिडिओ

Sanjay Raut On shivaji maharaj statue collapse : संजय राऊतांचा अदानींवर हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

Published by : Team Lokshahi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्यावर भाजपमधील बोगस शिवप्रेमींच काय मत आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. लाडक्या उद्योगपतींकडून महाराजांचा अपमान केला गेला असं म्हणत संजय राऊत यांनी अदानींवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अशा प्रकारे विटंबना भाजपच्या लाडक्या उद्योगपतींकडून होत असेल तर ती अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी श्रद्धा नाही, प्रेम नाही, महाराष्ट्राविषयी अभिमान नाही, कदाचित यापूढे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो काढून आपल्या कार्यालयात आणि घरामध्ये अदानीचे फोटो आणि पुतळे लावतील ही यांची अवस्था झालेली आहे.

राज्यपाल कोश्यारी, प्रफुल्ल पटेल अशा अनेक लोकांनी महाराजांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रत्येक जण हा भाजप पक्षात आहे, यावरून तुम्ही समजून जा की यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती आदर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा