व्हिडिओ

Rajkot Fort | Sanjay Raut | राजकोट राड्यावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

राजकोट राड्यावरून संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कोकणची संस्कृती मातीमोल होत आहे असे राऊत म्हणाले.

Published by : Dhanshree Shintre

राजकोट राड्यावरून संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कोकणची संस्कृती मातीमोल होत आहे असे राऊत म्हणाले. तर पोलिसांच्या वर्दीचाही मान ठेवला जात नाही. सिंधुदुर्गकरांना आता लोकसभेतील चूक लक्षात आली असेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे आणि नाव न घेता राणे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी आज राजकोट किल्ल्यावर भेट दिली होती आणि त्यानंतर त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

मी आपल्या जिल्ह्याची परिस्थिती जी आहे जनतेला आता कळलं असेल की त्यांनी लोकसभा निवडणूकीत काय चूक केली. त्यांचं स्वातंत्र्य, त्यांनी प्रतिष्ठा, त्यांचा मोकळेपणा जगण्याचा सगळं गमावून बसलो आहे आणि या कोकणची संस्कृती पुन्हा एकदा मातीमोल होताना मला दिसतंय. असं आहे का नावं कशाला घ्यायची, नावं घ्यायची काही गरज नाहीये. ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची संस्कृती असेल तर मला असं वाटतं की गृहमंत्र्यांनी सांगावं की हो ही माझी संस्कृती आहे असं संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा

Pune : पुण्यात मुसळधार पाऊस; थेऊरमधील 50 घरामध्ये शिरलं पाणी

Mumbai Monorail : मुंबईतील मोनोरेल पुन्हा ठप्प; महिन्याभरात तिसऱ्यांदा बिघाड

Mumbai Heavy Rainfall : मुंबईत मुसळधार पाऊस; लोकल ट्रेन उशिराने, रस्त्यांवर पाणी साचले