बदलापूर घटनेदरम्यान नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवरून हटण्यास नकार दिला आहे. या घटनेमुळे बदलापूरमध्ये पालक आणि नागरिक संताप व्यक्त करत आहेत. बदलापूर स्टेशनवर रेलरोको आंदोलन करताना दिसून येत आहेत, त्यामुळे रेल्वे रुळावरील आंदोलनामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. आंदोलनादम्यान पोलिसांकडून देखील आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झालेल्या घटनेमुळे पालक तसेच नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
या घटनेदरम्यान संजय शिरसाट म्हणाले, 4 वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार ज्याप्रकारे झाला आहे. त्याच्या सर्व ठिकाणी निषेध होत आहे, पण कोणाला निषेध करणे, कोणाला निलंबन करणे, पोलिसांना कारवाई करण्यास सांगणे हे आता बसं झालं. हे अशे जे नराधम असतात ना यांना रस्त्यावर चिरडून मारल पाहिजे. "कायदा गेला उडत मी बोलतोय हे जबाबदारीने बोलतोय एक लोकप्रतिनीधी म्हणून". काही लोकांना कायद्याचा धाक हा कायद्यानुसार देऊन चालत नाही, या नराधमाला रस्त्यावरच मारलं पाहिजे आणि सामूहिक पद्धतीने मारलं पाहिजे ही भावना प्रत्येक माणसाची आहे माझीसुद्धा आहे.