एकनाथ शिंदेंना कोणतं पद मिळणार? यावर संजय शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन संपुर्ण जगाला हे सांगितले की आपली महायुतीचे सरकार आलेलं आहे आणि जर कोणाला वाटत असेल की, मी नाराज आहे किंवा त्यांच्या मध्ये येत आणि तर मी हे स्पष्ट करतो की जो निर्णय वरिष्ठ नेता घेतील तो निर्णय मला देखील मान्य आहे माझी दुसरी काहीच अट वगैरे नाही. तसेच मी कोणत्या पदासाठी अडून नाही आहे. एवढ सगळ स्पष्ट केल्यानंतर त्यांच्यावर आरोप करण योग्य नाही आहे.
ईव्हीएमच्या आरोपांवर संजय शिरसाट म्हणाले-
ईव्हीएम आरोप करत आहेत त्यांच्यावर देखील आता कारवाई करण्यात येत असेल तर ते बरोबर आहे. कारण निवडणुकीच्या आधीसुद्धा ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्यात आली होती. तरी पण आता 3 तारखेला पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने आता सांगितलं आहे ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांनी ते सिद्ध देखील करून दाखवा. असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.