Mesai Jawalga Fake attack story 
व्हिडिओ

मेसाई जवळगा गावच्या सरपंचांचा प्रताप उघड; धक्कादायक माहिती समोर

तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःवर हल्ल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. यामागचं कारण काय जाणून घेऊयात.

Published by : Gayatri Pisekar

एकीकडे राज्यामध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राजकारण ढवळलं आहे. तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एका सरपंचाने स्वतःवर हल्ल्याचा बनाव रचला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

बंदूक परवाना मिळवण्यासाठी मेसाई जवळगा गावच्या सरपंचांनी स्वतःवर हल्ल्याचा बनाव रचला आहे. अशी धक्कादायक माहिती धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरण बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. प्रत्यक्ष घटनास्थळावरील वस्तूस्थिती आणि सरपंचांनी दिलेली तक्रार यामध्ये तफावत आढळून आली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

काय म्हणाले पोलीस अधिक्षक?

प्रत्यक्ष घटनास्थळावरील वस्तूस्थिती आणि सरपंचांनी दिलेली तक्रार यामध्ये तफावत दिसून आली. या सर्व बाबींची बारकाईने तपासणी केली. त्यानंतर सखोल तपासात हा बनाव आपण स्वत:च रचल्याचे फिर्यादीने कबूल केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फिर्यादीला आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना हवा होता. त्यासाठी त्यांनी हा बनाव केला असल्याचं अखेर फिर्यादीने कबूल केलं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी AIचा वापर

Latest Marathi News Update live : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आज लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना अडकलेला व्यवव्हार पूर्ण होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य