SHIVENDRA RAJE BHOSALE DEMANDS BJP LEADERSHIP, SLAMS NCP OVER HISTORICAL INJUSTICE 
व्हिडिओ

Satara ZP Election: 'जिल्हा परिषदेवर भाजपचाचं झेंडा फडकणार' शिवेंद्रराजे भोसलेंची मागणी

Maharashtra Politics: सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचं झेंडा फडकावा, अशी मागणी शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. त्यांनी राष्ट्रवादीला पूर्वी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही अन्याय झाला असल्याचा दावा केला.

Published by : Dhanshree Shintre

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा लागला पाहिजे, ही भूमिका साताऱ्यातील सर्व आमदार आणि मंत्र्यांची ठाम आहे. ज्या पक्षासाठी आम्ही पूर्वी काम केलं, त्या राष्ट्रवादीला या जिल्ह्याने तब्बल आठ आमदार दिले; मात्र तरीही साताऱ्यावर कायम अन्यायच झाला, अशी स्पष्ट टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली आहे.

आज सातारा जिल्ह्यात महायुतीचे पाच मंत्री आहेत, त्यापैकी दोन मंत्री भाजपचे आहेत. भाजपला साताऱ्याने भरभरून मतदान दिलं आणि पहिल्याच प्रयत्नात भाजपने पाच मंत्री देत जिल्ह्याला न्याय दिला, असं ते म्हणाले.

दरम्यान, जिल्ह्यातील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष हे निवडणुकीपुरते ये–जा करतात, अशी खोचक टीका करत, प्रदेशाध्यक्षांच्या गावातला रस्तासुद्धा भाजपनेच दिला आहे, हे विसरून चालणार नाही, असा टोला त्यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा