सतीश प्रधान यांचे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर, शिवसेना नेते तसेच स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे सतीश प्रधान यांचे आज दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले. त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे. सतीश प्रधान यांच्या निधनाने शिवसैनिक हळहळ व्यक्त करत आहेत.