व्हिडिओ

Thane : ठाण्यामध्ये पिकनिकला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग; तीन शिक्षक निलंबित

Published by : Team Lokshahi

ठाण्यामध्ये पिकनिकला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कापूरवाडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. तर मनसेने देखील या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत शाळा प्रशासनाला जाब विचारलाय. यानंतर पिकनिकला घेऊन जाणाऱ्या 3 शिक्षकानांही निलंबित करण्यात आलं आहे.

ठाण्यातील एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांची पिकनिक गेली असताना शालेय विद्यार्थ्यांचे विनयभंग केल्याप्रकरणी कापूरवाडी पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे. सदरची घटना दोन दिवसांपूर्वी घडल्यानंतर आज पालकांनी शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला असता पिकनिक घेऊन जाणाऱ्या तीन शिक्षकांना देखील शाळेने निलंबित केले आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी यावेळी गोंधळ घातल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

या खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणानंतर मनसे नेते अविनाश जाधव व स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला आहे. या घटनेनंतर कापूरबावडी पोलिसांनी जावेद खान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. तर प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस करीत आहेत.

"मुंबई-ठाण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघाची डरकाळी फुटली"; पदाधिकारी मेळाव्यात CM शिंदेंचं मोठं विधान

Skin Care: उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या...

Mother's Day 2024: मातृदिनाला आईसोबत नक्की भेट द्या 'या' धार्मिक स्थळांना

Daily Horoscope 11 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या संपत्तीत होईल भरभराट; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 11 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना