पुण्यातील वसंतदादा शुगर इन्सिटयूला ४८ वर्ष पुर्ण झाले आहेत. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बाबासाहेब पाटील, तसेच दिलीप वळसे पाटील यांची देखील उपस्थिती लागणार आहे.
हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर या कार्यक्रमामध्ये ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याला, यंदाचा कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच दोन राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकत्र होणार असल्याच्या चर्चेनंतर, आता काका पुतण्या दुसऱ्यांदा एकाच मंचावर येणार आहेत.