व्हिडिओ

Shahu Maharaj : विकासाच्या कामाला गती देण्यास प्राधान्य राहिल,शाहू महाराजांची प्रतिक्रिया

निवडणूक लढवावी हा जनतेचा आग्रह असावा असं शाहू महाराज यांनी सांगितलं आहे.

Published by : Dhanshree Shintre

लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल म्हणजेच (गुरुवारी) श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंकडून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर शाहू महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक लढवावी हा जनतेचा आग्रह असावा असं शाहू महाराज यांनी सांगितलं आहे. विकासाच्या कामाला गती देण्यास प्राधान्य राहिल. फुले, शाहू आणि आंबेडकरांचं माझ्यावर प्रभाव असल्याच छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटलं आहे.

आता जनतेला असं वाटलं असेल की आपण एका स्तरावर आलो आहे इथे माझी आवश्यकता आहे. हीच वेळ आहे ज्यात महाराजांनी यात लक्ष घालावं त्यामुळे जनतेचा रयतेमुळे हा प्रश्न उद्भवला. सर्व पक्षांचा हेतू एकच असतो पण कशाला प्राधान्य द्यायचे आणि कशाला मागे ठेवायचं. विकास हा सातत्याने होत असतो, कोणासाठी थांबत नसतो विकासाच्या कामाला गती देण्यास प्राधान्य राहिल असे छत्रपती शाहू महाराजांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा