नागपुरात नव्या मंत्रिमंडळात ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ३३ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर ६ आमदारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याचपार्श्वभूमिवर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शंभूराज देसाई म्हणाले की, आम्ही जे आश्वासन या निवडणुकीत आमच्या महायुतीच्या मेनिफेस्टोमध्ये दिले होते ते आश्वासन पुर्ण करण्याचं काम आमच्या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली आमचे सरकार करेल... त्याचसोबत महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याच आणि चांगल काम आम्ही करू. वरिष्ठ नेत्यांना ज्यांना आता संधी मिळाली नाही, याच टर्ममध्ये याच पाच वर्षात शिंदे साहेब त्यांना देखील संधी देतील... पुढे माननिय एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. पोर्टपोलियो कोणाला कोणत मिळणार हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आता ठरतील बैठक घेऊन ते निर्णय घेतील...