Sharad Pawar in Temple, Video Team Lokshahi
व्हिडिओ

Sharad Pawar नास्तिक? राज ठाकरेंच्या आरोपानंतर मंदिरातील व्हिडिओ व्हायरल

राज ठाकरेंनी काल त्यांचा मंदिरातील फोटो पाहिला का असा सवाल केला होता.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल ठाण्यात घेतलेल्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. शरद पवार यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते की, शरद पवार हे नास्तीक असून, त्याप्रमाणंच ते काम करत असतात. एवढ्यावरच न थांबता ते पुढे त्यांनी पवारांचा मंदिरातील एकही फोटो सापडणार नाही असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) यांचे मंदिरातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Sharad Pawar in Temple, Video)

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं. मी नेहमी प्रचाराची सुरुवात करत असताना एका मंदिरात नारळ फोडतो असं शरद पवार म्हटले, मात्र त्या धार्मिक गोष्टी सर्वांसमोर मांडण्याची आवश्यकता वाटत नाही असं शरद पवार म्हटले. त्यानंतर आता शरद पवार यांचा बारामतीतील हनुमानाच्या देवळातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये बारामतीमधील कन्हेरी गावातील हनुमानाच्या मंदिरात शरद पवार हे स्वत: पुजेमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. त्यामुळे राज ठाकरे आता या आरोपांना नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा