विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार विलास लांडेंनी यू-टर्न घेतलाय. विधानसभेवेळी शरद पवारांची तुतारीचा प्रचार केलेल्या विलास लांडेंनी आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजित दादांचा झेंडा हाती घेणार असल्याचं स्वतःचं जाहीर केलंय. इतकंच नव्हे, तर निवडणुकीवेळी अजित पवारांची साथ सोडून तुतारी फुंकलेले अजित गव्हाणे हे वीस माजी नगरसेवकांसह पुन्हा घड्याळ हाती घेणार आहेत. या संदर्भात अजितदादा आणि अजित गव्हाणेंचं बोलणं झाल्याचा दावाही विलास लांडेंनी केलाय.