लाडकी बहीण योजनेवरुन फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मविआचा सत्ता आल्यास लाडकी बहीण योजना बंद करतील आमच्या काळातील सर्व योजना मविआने बंद केल्या आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे. काही लोक राजकारणाची पट्टी तोंडाला बांधत आहेत असा हल्लाबोल देखील फडणवीसांनी विरोधकांवर केलेला आहे.
याचपार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, रोज नवीन गोष्टी याठिकाणी बोलतात. योजना कशी बंद करता येऊल असा प्रयत्न करतात खरं तर यांची नियत काय आहे हे आपण लक्षात घ्या. महायुतीच सरकार गेल्यानंतर मविआचं सरकार आलं त्यांनी पहिलं काम काय केलं असेल महायुतीच्या काळातल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या. आता ही त्यांना हेच करायच आहे मला निवडून द्या म्हणतात आम्ही सरकारमध्ये येतो म्हणतात हे सरकारमध्ये आल्यावर पहिल काम काय करतील तर लाडकी बहीण योजना बंद करुन टाकतील, मोफत गॅस सिलेंडरची योजना बंद करुन टाकतील, मोफत शिक्षणाची योजना बंद करुन टाकतील.