व्हिडिओ

Shinde On ShivsenaUBT Mashal: 'यांची' मशाल क्रांती घडणवणारी नाही, घरं पेटवणारी'; शिंदेंची जहरी टीका

यांची मशाल क्रांती घडवणारी नाही तर घर पेटवणारी असा हल्लाबोल करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published by : Team Lokshahi

यांची मशाल क्रांती घडवणारी नाही तर घर पेटवणारी असा हल्लाबोल करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पक्षाच्या मशाल चिन्हावरून आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली आहे. तुमची साथ कॉंग्रेसला आहे आणि कॉंग्रेसची साथ ही दहशतवाद्यांना आहे. बाळासाहेबांनी तुम्हाला उलट टांगलं असतं. असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

तर पुढे शिंदे म्हणाले, तुम्हाला वेगळ नाव दिल आहे तुम्हाला वेगळ चिन्ह दिल आहे चिन्ह पण मशाल आहे. मशाल म्हणे क्रांतीची आहे, घर पेटवणारी मशाल घेतली आहे. घराघरात आग लावाची, जाती जातीमध्ये द्वेष पसरवायच काम चालू आहे. बाळासाहेब असते तर तुमचे कतृत्त्व बघून त्यांनी तुम्हाला उलट टांगून खालून मिर्चीची धुरी दिली असती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा