थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(Eknath Shinde) राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत आगामी निवडणुकांसाठी बैठकांचा सिललिला पाहायला मिळत असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
आज संध्याळी 6 वाजता ही बैठक बोलावण्यात आली असून मुंबईतील सर्व मुख्य नेते, उपनेते आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मुक्तागिरी बंगल्यावर ही बैठक असणार आहे. बीएमसी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summery
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक
नेते उपनेते, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
सायंकाळी 6 वाजता मुक्तागिरी बंगल्यावर होणार बैठक