शिवसेनेचे आमदार अपात्र प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या वेळेत बदल झाला आहे. दुपारी 1 ऐवजी सकाळी 11 वाजता सुनावणी असेल. गेल्या सुनावणीत नव्याने पुरावे सादर करण्यास मुदत दिली होती. शिवसेनेच्या दोन्ही गटांना 16 नोव्हेंबर पर्यंत विधानसभा अध्यक्षांनी मुदत दिली होती. उद्या दोन्ही गटांच्या नव्याने सादर झालेल्या पुराव्यांची तपासणी होणार.