Road Accident|Viral Video team lokshahi
व्हिडिओ

रस्ता अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

इतरांच्या चुकांमुळे लोक अपघाताचे बळी ठरतायत

Published by : Shubham Tate

आज हजारो-लाखो वाहने रस्त्यावर धावत आहेत, अशा परिस्थितीत सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही पायी चालत असाल किंवा गाडीने प्रवास करत असात तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही कधी किंवा कुठे अपघाताला बळी पडू शकता हे कोणालाच माहीत नाही. भरधाव वेगामुळे अनेकदा अपघात होत असले तरी काही वेळा इतरांच्या चुकांमुळे लोक अपघाताचे बळी ठरतायत. (shocking video of road accident went viral on social media)

अनेकवेळा लोक रस्त्याच्या कडेला उभे राहतात आणि त्यांच्यासोबत अपघात होत असल्याचे दिसून येते आहे. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये लोक जाणूनबुजून किंवा नकळत रस्ते अपघाताचे बळी ठरतात. अशाच एका अपघाताचा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला हॉलिवूडचा फायनल डेस्टिनेशन चित्रपट नक्कीच आठवेल.

तसंच दृश्य या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी वाहनाचेच नुकसान झाले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक माणूस रस्त्याच्या कडेला आरामात उभा आहे, तेव्हा एका ट्रकने त्याला पाठीमागून धडक दिली. ट्रक झाडाच्या फांदीला धडकला आणि चालकाचे नियंत्रण सुटले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी