सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी वालावल ग्रामपंचायत पुन्हा एकदा भाजपने स्वतःकडे राखण्यात यश मिळवले आहे. या गावच्या सरपंच पदी राजा प्रभू यांची वर्णी लागली असून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि राज्यात भाजपचेच वर्चस्व दिसून आले असल्याचा दावाही राजन तेली यांनी केला आहे.