बीडच्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी एक मोठा अपडेट समोर आला आहे. सरकारने या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. एसआयटीचे प्रमुख व पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी या तपासासाठी ९ जणांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती, जी मान्य करण्यात आली आहे. यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपअधीक्षकांचा समावेश देखील आहे.