कुर्लामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात मुख्य आरोपी संजय मोरेची नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीने झाली असल्याचं समोर आलं आहे. पण त्याची नियुक्ती बेस्ट प्रशासनाने तपासण गरजेचं होत, त्यामुळे बेस्ट प्रशासन यासर्व अपघाताला जबाबदार असल्याचं आरोप बेस्ट बस समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांनी केला आहे. तसेच तत्काळीन पालिका आयुक्त जय मेहता यांच्या अनास्थेमुळे बेस्ट प्रशासनामध्ये कंत्राटी पद्धतीच प्रवेश झाल्याचा ठपका देखील सुनिल गणाचार्य यांनी उठवला आहे.
याचपार्श्वभूमीवर सुनिल गणाचार्य म्हणाले की, मुंबईमध्ये बीएसटी ही अतिशय सुरक्षित प्रवासासाठी मानली जाते. परंतू गेल्या 6 ते 7 वर्षापासून बीएसटीमध्ये खाजगी कंत्राटदारांचा शिरकाव झाला आणि तेव्हापासून त्यांच्यावर जे नियंत्रण बेस्ट प्रशासनाचं असायला हव होत, ते प्रशासन हळूहळू निसटत गेलं. त्यामुळे अशेप्रकार गेल्या काही वर्षांपासून अधिक प्रमाणात व्हायला लागले. तर पुढे ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये सुमारे 250 अपघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहेत.