नितीश कुमार रेड्डीचे कुटुंबीय आणि सुनील गावस्कर यांच्या मेलबर्नमधील भेटीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. नितीश रेड्डीच्या शतकाचं सर्वच माजी खेळाडूंनी खूप कौतुक केलं. नितीश रेड्डीच्या शतकाच्या वेळेस सुनील गावसकर इंग्रजीत कॉमेंट्री करत होते आणि त्याचं शतक पूर्ण होताच त्यांनी उभं राहून टाळ्या वाजवत कॉमेंट्री केली होती. आता त्याच्या या शतकानंतर सुनील गावसकरांनी नितीश कुमारच्या कुटुंबीयांची भेट घेतली या भेटी दरम्यान नितीश रेड्डीच्या वडिलांनी सुनील गावसकरांना भेटताच पायावर डोकं ठेवून अभिवादन केलं आहे.
नितीश कुमार रेड्डीची शानदार कामगिरी
भारत ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामना खेळत असताना तो शांतपणे आणि संयमाने आपली खेळी खेळताना दिसला. त्याने 176 बॉलमध्ये आपली सेंच्युरी पुर्ण केली आहे. सुरुवातीला नितीश कुमार रेड्डीच्या फलंदाजीने टीम इंडियाचा डाव फसलेला होता. मात्र जडेजाच्या सोबत त्याने ३० धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदर मैदानात आल्या बरोबर त्याची साथ नितीश रेड्डीसाठी डाव फिरवणारी ठरली. या जोडीने ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट खेळताना ८ व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.