शिंदे गटाचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निधी देताना दूजाभाव करतात, याबाबतची तक्रार अजित पवार यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याच वृत्त होतं. या वृत्ताचा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दात विरोध केला असून या केवळ अफवा असल्याचं म्हंटले आहे.
सव्वा तास चर्चेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितल. तीनही पक्षात उत्तम समन्वय असून हे महायुतीचे सरकार जलद गतीनं चालणार असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे.