सुनील तटकरेंनी संजय राऊतांवर घणाघात केला आहे. राऊतांची वैचारिक पातळी खालावल्याचं तटकरेंनी म्हटलं आहे. आक्रस्ताळपणे वक्तव्य करण्यासाठी राऊत प्रसिद्ध आहे असं त्यांनी म्हटलं आहे. राऊतांनी तपासणी करुन घ्यावी असा सल्ला देखील सुनील तटकरे यांनी दिलेला आहे. तर अजित पवार यांच्या टीकेमुळे आता राऊत हे लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे.
संजय राऊतांची वैचारिक पातळी दिवसेंदिवस खालावली जात आहे आणि विशेष करुन ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी एक वेगळी भूमिका घेतल्यापासूनच ते आक्रस्ताळपणाने वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध झालेले आहेत. पण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना दिल्याच्यानंतर खरंतर त्यांना सल्ला देईन की त्यांनी त्यांची योग्य ती लवकर तपासणी करुन घ्यावी. अशाच पद्धतीचे वक्तव्य करत राहिले तर मुलुंडला जे हॉस्पिटल होतं तिथे दाखल करण्याची पाळी शिवसैनिकांच्यावरती येऊ नये एवढीच माझी अपेक्षा त्याठिकाणी आहे असे सुनील तटकरे म्हणाले.