थोडक्यात
शिवसेनेचं पक्ष आणि चिन्हावर आज अंतिम सुनावणी
खरी शिवसेना कुणाची? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
धनुष्यबाण कोणाच्या हातात जाणार? याचा निर्णय होणार
(Shiv Sena Symbol) शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज अंतिम सुनावणी पार पडणार आहे. शिवसेनेचं नाव आणि धुनष्यबाणाचं चिन्ह कोणाच्या हातात जाणार? या खटल्यावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
त्यामुळे, धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम राहणार की पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार हे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला सुरू असून दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट निकाल देईल.
त्यामुळे आता खरी शिवसेना कुणाची या खटल्यावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार असून या निकालाकडे महाराष्ट्रासह अख्ख्या देशाचे लक्ष लागून आहे.