व्हिडिओ

Supriya Sule On Vinod Tawde: भाजपच्या नेत्याकडे एवढी कॅश कुठून आली? सुप्रिया सुळेंचा सवाल

राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्या पैसे वाटप प्रकरणावर सुप्रिया सुळेंचा प्रश्न उपस्थित केला आहे. याचपार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या,

Published by : Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये राडा झाला आहे. विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि विनोद तावडे यांच्यात यावेळी बाचाबाची झाली. हितेंद्र ठाकूर यांच्याकडून विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळेच, विरारच्या हॉटेलमध्ये वातावरण तापलं आहे. दरम्यान, विनोद तावडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्या पैसे वाटप प्रकरणावर सुप्रिया सुळेंचा प्रश्न उपस्थित केला आहे. याचपार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझा प्रश्न आहे या देशाच्या माननीय प्रधानमंत्र्यांना तुम्ही नोटबंदी केली नोटबंदी कशासाठी केली कारण काळापैसा जावा. मग हे 5 कोटी रुपये भाजपकडे कुठून आले? भाजपने एवढ्या 5 कोटींची हालचाल ते 5 कोटी विरारपर्यंत पोहचवण्याचे काम कसं केले? जी डायरी तिथे सापडली आहे त्या डायरीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच स्पष्टीकरण दिलं पाहिजे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा