परळीतील 'औष्णिक ऊर्जा' राखप्रकरण आणि 'ज्ञानराधा मल्टीस्टेट' आर्थिक गुन्हाप्रकरण आहे. ही प्रकरण ताजी असतानाच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष हे बीड जिल्ह्याकडे वळले आहे. बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी महासंचालक रश्मी शुल्का यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान सुरेश धस यांनी विविध मागण्या आणि आरोप केले आहेत. राख आणि आर्थिक गुन्ह्यांतील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी. तसेच निवडक पोलिस अधिकारी काही वर्षांपासून बीडमध्ये कार्यरत आहेत त्यांची बदली करावी. आर्थिक व्यवहार करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिस अधिकारी मदत करत असल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केला आहे.