व्हिडिओ

Navi Mumbai: खारघर-बेलापूर कोस्टल रोडसाठी सिडकोकडून टेंडर; रहिवाशांचा तीव्र विरोध

सिडकोतर्फे बेलापूर ते खारघर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोडला बेलापूरमधील रहिवासीयांनी आपला तीव्र विरोध दर्शविला आहे.

Published by : Dhanshree Shintre

सिडकोतर्फे बेलापूर ते खारघर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोडला बेलापूरमधील रहिवासीयांनी आपला तीव्र विरोध दर्शविला आहे. बेलापूर जेट्टी जवळ नवी मुंबईकरांनी एकत्र येत मानवी साखळी करत सिडको विरोधात आंदोलन केलं आहे. नवी मुंबई मनपातर्फे बेलापूरचा विकास करण्यात आला असताना सिडकोतर्फे मनमानी कारभार सुरु असून कोस्टल रोड बाबत नवी मुंबई मनपाला देखील कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे.

नवी मुंबईतील खारघरमधील जलमार्ग सेक्टर 16 ते बेलापूरला जोडणाऱ्या खारघर कोस्टल रोडच्या डिझाईन आणि बांधकामासाठी सिडकोने टेंडर प्रक्रिया सुरू केली. हा प्रकल्प 9.679 किलोमीटरचा आहे. त्यापैकी 2.986 किलोमीटर हा सध्याच्या रस्त्याचा भाग आहे. नवीन रस्त्यामध्ये स्टिल्ट कन्स्ट्रक्शन आणि ग्राउंड लेव्हल रिक्लेमेशन असेल, ज्यामुळे नवी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांदरम्यान चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. हा रस्ता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेरुळ वॉटर टर्मिनल, खारघर आणि इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...