व्हिडिओ

Satara Dhom Dam canal Burst : धोम धरणाचा कालवा फुटला! 150 ऊसतोड कामगारांना फटक; संसार गेला वाहून

साताऱ्यातील वाई तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. धोम धरणाचा डाव्या कालव्याला पहाटे मोठं भगदाड पडलं आहे.

Published by : Team Lokshahi

साताऱ्यातील वाई तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. धोम धरणाचा डाव्या कालव्याला पहाटे मोठं भगदाड पडलं आहे. हा कालवा फुटल्यानं ओझर्डे गावात मोठा पूर आला आहे. या पुराचा पाण्यात अनेक ऊस तोड कामगार अडकले होते. मात्र त्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या ऊस तोड कामगारांचे सर्व साहित्य ,अन्नधान्य,पैसे आणि काही बैलगाड्या, 2 बैल वाहून गेले. या ऊस तोड कामगारांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या घटनेच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन पोहचले असून या दीडशेच्या वर कामगारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र घरं आणि शेतजमीनीचं मोठं नुकसान झालं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा