नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं चित्र आहे. रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला अवघ्या 24 तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. मात्र, काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात गेला होता. चार दिवसांपुर्वी मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर भरत गोगावले यांनी दोन दिवसात तुम्हाला गोड बातमी मिळेल, असे सूचक विधान केले होते. भरत गोगावलेंनी सांगितलेली 2 दिवसाची मुदत संपली, तरी अद्याप पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेना अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं दिसून येत आहे.