हिवाळी अधिवेशनावेळी एकमेव लोकशाही मराठीनं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या उचलून धरल्या होत्या. राज्यातल्या कांदा, कापूस, द्राक्ष आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी, हमीभाव तसंच शासकीय खरेदीचे प्रश्न मांडले होते. यावर विचारलेल्या प्रश्नांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तरं दिली आहेत. अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून शासन पातळीवर हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावला जाणार असल्याचं आश्वासन भुसेंनी दिलं आहे.
काय म्हणाले दादा भुसे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही या प्रश्नी लक्ष देतील असं आश्वासन दादा भुसे यांनी दिलं आहे. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्रासोबतही चर्चा झाली असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कांदा निर्यात शुल्क २० टक्के रद्द करण्याची मागणी करण्यात आली असल्याची त्यांनी माहिती यावेळी दिली.