दिल्लीतील नवीन संसद भवनाप्रमाणे महाराष्ट्रातही नवीन विधानभवन तयार करण्यात येणार आहे. राहुल नार्वेकरांनी याबाबत संकेत दिले आहेत. राहुल नार्वेकरांनी आज विधासभा अध्यक्ष पदासाठी आज अर्ज भरला आहे. त्यांची उद्या बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून नवीन कार्यकाळात नवीन विधानभवन करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं त्यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना सांगितलं.