लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आणि एक बॅड न्यूजदेखील आहे. लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारकडून हिवाळी अधिवेशनात 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना डिंसेंबर महिन्याचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे आता येणारा हप्ता 1500 रुपये असणार की 2100 हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून वगळले जाणार आहे. आतापर्यंत सुमारे 10 हजार महिलांची नावे समोर आली असून या महिलांना योजनेतील लाभासाठी अपात्र घोषित केले जाईल तर, भविष्यात आणखी अनेक महिलांची नावे यामध्ये जोडली जातील, अशी माहिती मिळत आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. ज्यामध्ये अनेक अर्ज चुकीचे तसंच अपूर्ण असल्याचं सामोरं आलं आहे. ज्यामुळे अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आढळल्या आहेत. याशिवाय अनेकांनी चुकीच्या माहितीखाली लाभासाठी अर्ज केले आहेत. अशा परिस्थितीत, आता अपात्र महिलांना योजनेचे पैसे परतही करावे लागू शकतात.