अकोल्यामध्ये चालत्या एसटी बसला आग लागल्याची घटना घडली. अकोल्यातल्या अकोट पोपखेड रस्त्यावर ही घटना घडली. या आगीमध्ये बस जळून खाक झाली. या बसमधून 20 प्रवाशी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले.
ही घटना २ मार्च 2025 रोजी सकाळच्या सुमारास घडली. शहानूर- अकोट अशी एसटी बस चालली होती. पापखेड रस्त्यावर बस चालत असताना गाडीतून धुर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला लावून प्रवाशांना खाली उतरवले. बघता-बघता गाडीने पेट घेतला होता. आगीमुळे बस पूर्णपणे जळून खाक झाली. या बसमध्ये एकूण २० प्रवासी होते. या घटनेची माहिती अग्नीशमन दलाला देण्यात आली. मात्र अग्नीशमन दल पोहचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली. आगीमुळे बसचे खूप मोठे नुकसान झाले. एसटी बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.