पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक पार पडली. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची 10 वी बैठक झाली आहे.पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होते. बैठकीची थीम विकसित राज्य विकसित भारत अशी ठेवण्यात आली असून नीती आयोगाची बैठक सकाळी 9 वाजता दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरु झाली. या बैठकीत राज्याची प्रगती आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.