व्हिडिओ

Stock Market Updates : शेअर बाजारात आज पुन्हा घसरण; सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला

शेअर बाजारात आज पुन्हा घसरण झाली आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी तर निफ्टीमध्ये 102 अंकांनी घसरण झाली आहे.

Published by : Team Lokshahi

शेअर बाजारात आज पुन्हा घसरण झाली आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी तर निफ्टीमध्ये 102 अंकांनी घसरण झाली आहे. मार्केट करेक्शनमुळे आज देखील बाजाराच्या सुरुवातीला पडझडीचे सत्र सुरु आहे. 20 डिसेंबर रोजी, सेन्सेक्स निर्देशांक 931 अंकांनी घसरून 70,506 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 303 अंकांनी घसरून 21,150 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 30 समभाग घसरले, तर ऑटो, मेटल, बँक निफ्टी आणि सेवांसह जवळपास सर्वच क्षेत्रांत विक्रीचा जोर दिसून आला. या मोठ्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल 9.1 लाख कोटींनी घसरले. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 3,178 कंपन्यांचे शेअर्स घसरले. तर, 657 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा