चिखलदऱ्यात पहिल्यांदाच उन्हाचा पार 38 डिग्री पार झाला आहे. उन्हामुळे पर्यटकांनी फिरवली पाठ चिखलदरा तापमान वाढ झाली आहे. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असणाऱ्या चिखलदरा या पर्यटन स्थळाला या वर्षी पाहिल्यांदाच उन्हाचा जबर फटका बसला आहे.
चिखलदऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 38 ते 39 डिग्रीच्या पार गेलं आहे. चिखलदरा येथील भिमकुंड, पंचबोल पॉईंट, गावीलगड किल्ला, वन उद्यान या भागात पर्यटन स्थळांवर नेहमीच गर्दी असते. या वर्षी मात्र या भागात शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. पर्यटकांनी उन्हामुळे पाठ फिरवल्याने चिखलदरा येथील हॉटेल व्यवसाय ठप्प पडला आहे.