राज्यात थकीत मालमत्ता करावरील पेनल्टी टॅक्स माफ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नगरविकास विभागाचा मोठा निर्णय घेतला आहे. नगरपरिषद, नगरपालिका व नगरपंचायतांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
कर वसुलीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अभय योजनेची घोषणा करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या आयुक्तांकडे 50 टक्क्यांवरील पेनल्टी टॅक्स माफीचे अधिकार असल्याचं देखील सांगितलं जात आहे.