व्हिडिओ

Ro-Ro Ferry: ग्रीसवरून तिसरी रो-रो बोट मुंबईत दाखल

मुंबईची पहिली अत्याधुनिक रो-रो बोट 15 मार्च 2020 मध्ये सुरू झाली आहे.

Published by : Dhanshree Shintre

ग्रीसवरून तिसरी रो-रो बोट मुंबईत दाखल झाली. या बोटीच्या कस्टम तसेच इतर प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू असून सप्टेंबरनंतर ही बोट मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती सागरी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईची पहिली अत्याधुनिक रो-रो बोट 15 मार्च 2020 मध्ये सुरू झाली आहे. भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान ही सेवा सुरू आहे. तर दुसरी मिनी रो-रो बोट वसई ते भाईंदर दरम्यान 20 फेब्रुवारी 2024 पासून कार्यरत आहे. या दोन्ही मार्गावरील सेवा मुंबईकर आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरली होती. आता तिसरी बोट लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

या दोन्ही मार्गावरील सेवा मुंबईकर आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरली होती. भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान घावणाऱ्या रो-रोतून गेल्या चार वर्षांत 20 लाखापेक्षा जास्ता पर्यटकात समुद्रसफर केली आहे. भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान सध्या एकच रो-रो बोट असल्याने देखभाल दुरुस्ती आणि फेऱ्यांची संख्या वाढवता येत नसल्याने दुसरी बोट खरेदी करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rahul Gandhi : चंद्रपूरच्या राजुऱ्यातही मतचोरी? राहूल गांधींचा दावा, भाजपाने फेटाळला आरोप

Asia Cup 2025 PAK vs UAE : आधी पाकिस्तान-यूएई सामना चर्चेत, नंतर सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू आला चर्चेत; थेट अम्पायरलाच चेंडू मारला

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठा विजय, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका फेटाळली

Smart Sunbai : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित