गेल्या अनेक दिवसांच राजकारण पाहता राजकारणातत काहीही होऊ शकत. राज ठाकरे यांनी केलेल्या उद्धव ठाकरेंसोबतच्या एकत्र येण्याच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळचं वळण पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत.
तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील आपली सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता समोर येत असलेल्या वक्तव्यावर आगामी काळात येणार राजकारण कसं असेल याकडे सर्वांच लक्ष आहे. याचपार्श्वभूमिवर उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंत म्हणाले की, "जर आपल्याला टप्पा जवळ आलेला माहित असेल, तर माझ्यापर्यंत आणि देसाई आमच्यापर्यंत पोहचला असता. आमच्या माहिती प्रमाणे राज ठाकरे आता परदेशात आहेत. ती जी मुलाखत होती ती दीड महिन्यापुर्वींची होती. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. राज ठाकरेंना मी जितकं ओळखतो, त्यांना झुकवून युती होऊ शकेल असं वाटत नाही, असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या अटी म्हणजे... देवेंद्र फडणवीसांशी बोलायचं नाही, एकनाथ शिंदेंना पाहायचं नाही. असल्या अटी राज ठाकरे जुमाणणार नसल्याचं सामंत म्हणाले आहेत. असल्या अटी शर्थी पुढे झुकून राज ठाकरे युती करतील", असं वाटत नसल्याचं मत सामंतांनी व्यक्त केलं आहे.