यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना घोषित करण्यात आला आहे. मंगेशकर कुटुंबीयांनी परिपत्रकाच्या माध्यमातून पुरस्कारांची घोषणा केली आहे. दरम्यान कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी,शरद पोंक्षेंनादिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ज्येष्ठ व्हायोलिन वादक एन. राजम, ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनीस, गायिका रीवा राठोड यांनाही दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. 24 एप्रिलला सरसंघचालकांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होणार आहे.