व्हिडिओ

Gondiya | 150 किलो टोमॅटो चोरीला; गोंदिया मार्केटमध्ये घडली चोरी

Published by : Team Lokshahi

गोंदिया: सर्वसामान्यांना जेथे एक किलो टोमॅटो खरेदी करणे जड जात आहे. यातच चोरट्यांनी बाजारातील दुकान फोडून तेथून १५० किलो टोमॅटोसह, मिरची व रोख रक्कम २,५६० रुपये लंपास केले आहेत.

गोंदिया शहरातील भाजी बाजारात किशोर धुवारे (४२) यांचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यानी रात्री दरम्यान दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व ११,२५० रुपये किमतीचे १५० किलो टोमॅटो, १८०० रुपये किमतीची मिरची तसेच गल्ल्यातील २,५६० रुपये रोख असा एकूण १५,६१० रुपयांचा माल लंपास केला. यापूर्वी देखील ३० जून रोजी याच बाजार परिसरातून २० कॅरेट टोमॅटोची चोरी झाली होती.

विशेष म्हणजे भाजी बाजार पासून शहर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असून पोलीस स्टेशन परिसरामध्येच चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. तर या संदर्भात दुकानदारांनी देखील या भाजी बाजार परिसरामध्ये पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे.

संकल्प पत्राचं अनावरण करताना श्रीकांत शिंदे म्हणाले; "खुद्द PM नरेंद्र मोदींनी मला पत्र पाठवलं आणि..."

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत झालेल्या गोंधळावर भारती पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Amravati : अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांची वणवण

पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोवर विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल; म्हणाले...

PBKS VS RR: पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 5 गडी राखून केला पराभव