Shocking Video team lokshahi
व्हिडिओ

Shocking Video : विमान अपघाताचा भयावह व्हिडीओ व्हायरल, पाहा अवघ्या 2 सेकंदात पायलटने कसे वाचवले प्राण

विमान अपघाताचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Published by : Shubham Tate

trending video : लाखो, करोडो वाहने दररोज रस्त्यावर धावतात, अशा परिस्थितीत रोज कुठे ना कुठे अपघात होताना दिसतो किंवा ऐकायला मिळतो. कधी अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो तर कधी लोक थोडक्यात बचावतात. रस्ते अपघातांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर (social media) व्हायरल होतात, जे आश्चर्यकारक असतात, परंतु विमान अपघाताचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (trending plane crash viral video on social media)

विमान अपघात फारच दुर्मिळ आहेत आणि अपघातांशी संबंधित व्हिडिओ त्यातही क्वचितच पाहायला मिळतात. हा अपघात एवढा धोकादायक आहे की, तो पाहिल्यानंतर लोकांचा श्वास थांबतो. भाग्यवान आहे की पायलट वेळेवर विमानातून बाहेर पडतो, अन्यथा 2 सेकंदाचा विलंबाने देखील त्याचा जीव घेतला असता.

विमान कसे असंतुलितपणे खाली पडू लागतं, हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. जेव्हा विमान जमिनीपासून थोडे वर असते तेव्हाच पायलट बाहेर पडतो आणि पॅराशूटच्या मदतीने हवेत उडतो. यादरम्यान पायलट विमानातून बाहेर येताच अवघ्या दोन सेकंदात विमान जमिनीवर कोसळते आणि जोरदार टक्कर होऊन मोठा स्फोट होऊन विमानाचे तुकडे होतात. हा स्फोट एवढा भीषण होता की आगीच्या ज्वाळांच्या लोळ दूरवर उठताना दिसत आहेत. या अपघातात पायलटची वेळ अत्यंत अचूक असल्याने त्याचा जीव वाचला.

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @LookedExpensive या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 9 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा