भाजप मुंबईमध्ये भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे. मुंबई अध्यक्षपदासाठी प्रविण दरेकर आणि अमित साटम यांची नावं सध्या जोरदार चर्चेत आहेत. यासंदर्भात मुंबईतील भाजप आमदारांची आज बैठक झाली. भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष ही या बैठकीला उपस्थित होते. भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या नेतृत्वात ही बैठक झाली आहे.